DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्ह्यात उष्माघाताच्या १५ रुग्णांवर उपचार

जळगाव : राज्यभरात बहुतंश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशावर गेला असुन जळगाव जिल्हयात तर यंदा देखील ४५ अंशाच्यावर नोंद झाली आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास अनेकांना जानवू लागला आहे. राज्यभरात उष्माघाताच्या २६७ रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या काळात उष्माघाताच्या १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याच्या कार्यकाळात तापमान वाढल्याने नागरिकांना उष्माच्या त्रासाची लक्षणे जाणवली. त्यांच्यावर वेळीच आरोग्य केंद्रामध्ये उपचार झाल्याने त्यांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यात एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत तापमानाने उच्चांक गाठला. तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचा त्रास झाल्याचे बहुतांश रुग्णांनी या दोन महिन्याच्या काळात उपचार घेतले. जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, भुसावळ, रावेर, चाळीसगाव, पाचोरा या तालुक्यात उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच तापमानाच्या पाराने चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली होती. उष्माघात कक्षाच्या माध्यमातून जिल्हाभरात रुग्णांवर उपचाराची सुविधा करण्यात आली होती. मे महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताने ५० पेक्षा अधिक जणांना उन्हाच्या तडाख्याने जीव गमावावा लागला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरीकांना उन्हाची तिव्रता लक्षात घेता उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले होते. जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जिल्हा रुग्णालयातही उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात उष्माघातामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रस्ते व फुटपाथवर राहणाऱ्या बेवारसाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

नागरीकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करावा. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी जास्त प्रमाणात पाणी व थंड पेयाचे सेवन करावे. उन्हाचा त्रास झाल्यास तातडीने थंड पेय किंवा ओआरएस घ्यावे.

-डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जळगाव

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.