उद्धव ठाकरेंनी मानले पवारांच्या आभार; म्हणाले, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा…
मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीवरून सध्या राजकारण एकदम ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गटा विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते. तर, राज ठाकरेंनंतर राष्ट्रवादी सर्वासर्वे शरद पवार यांनी सुद्धा निवडणुक बिनविरोध घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यावरच आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा त्यांनी दाखवला आहे. त्याबद्दल शिवसेना कुटुंब त्यांच्यासाठी सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. अश्या शब्दात त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहे.

पराभूत करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला
राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची आणि कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणुक लागली आणि शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला. त्यांना निवडणुकीपासून पराभूत करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेल आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.