उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातूनचे नेतृत्व करणाऱ्या पूनम महाजन यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही . राजकारणात नवख्या असलेल्या ज्येष्ठ विधितज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. येथून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहेत. उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. राजकारण हे नवीन क्षेत्र मला आहे. पंरतु माझा प्रमाणिक प्रयत्न जे कोणी देशद्रोही करतील त्यांच्या विरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी, सामन्य गरीब माणसाला न्याय कसा मिळेल हे पाहणे असेल’, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
राजकारण नवीन असलो तरी राजकारण कुठेही करणार नाही. समाजकारण करत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले. भारतीय जनता पक्षाने BJPआपल्यावर जो विश्वास टाकला आहे. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
आव्हान पेलण्यात सक्षम
वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना राजकीय अनुभव आहे. मात्र, मी मुंबईत अनेक खटले चालवले. मुंबापुरती वाचवण्याचे काम केले. त्यामुळे कुठलेही आव्हान पेलण्यास मी सक्षम आहे. लहानपणापासून अभ्यासू वृ्त्ती जोपासली आहे. मुंबईत काय अडचणी आहेत त्या समजून घेऊन लोकसभेत मांडेल.