DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

“उमंग”ने दिले मायेचे “उबदार वाण”

सर्वसामान्य भगिनींना वाण वाटपाची “उमंग”ची तपपूर्तीचा आनंद

चाळीसगाव :  गेल्या बारा वर्षांपासून गोरगरीब,विधवा माता भगिनींना वाण वाटपाचा उपक्रम उमंगच्या माध्यमातुन सात्तत्याने सुरु ठेवला आहे. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जिवातील देवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे असून संक्रांतीच्या काळात याला महत्व असून या वाणामुळे देवीदेवतेची कृपा होऊन इच्छित प्राप्ती होणार असल्याने या सर्व गोरगरीब महिला भगिनींच्या मनोकामना पूर्ण व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करते. आज विविध कष्टकरी श्रमकरी सुवासिनिंना हळदी कुंकवाचा टिळा लावून महीला भगिंनिंना उबदार ब्लँकेट देऊन त्यांचा सन्मान केला असून *सर्वसामान्य भगिनींना वाण वाटपाची “उमंग”ची तपपूर्तीचा आनंद असल्याचे प्रतिपादन उमंग समाजशिल्पी महीला परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील यांनी केले आहे.

आज शहरातील विविध भागातील महिला भगिनी यांना उंमग च्या वतीने उबदार ब्लँकेट वाटपाचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परीसरात आयोजीत करण्यात आला होता. सर्वप्रथम उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.   यावेळी संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील, विद्यमान अध्यक्ष साधनाताई पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सदस्य रवीभाऊ चौधरी, अयासखान पठाण, अनिताताई शर्मा ,रत्नप्रभा नेरकर, सुवर्णताई राजपूत, रोशनीताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मुकेश गोसावी, आरोग्यदूत बबडी शेख, राहुल पाटील, राहुल कुमावत, निलेश देसले, विकी चौधरी, कैलास दुबे, सारंग जाधव, सौरव पाटील, गणेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

पतंग आणी ब्लँकेट वाटप
                शहरातील विविध माता भगिनींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी पतंग व दोरा यांचे पूजन करून सर्वांना तिळगुळ देण्यात आला. सारजाबाई मांडोळे, जनाबाई पाटील, मंगलाबाई अहिरे, प्रभावती दुबे, भिमाबाई अहिरे, विमलबाई पाटील, मीराबाई जाधव, सुनंदा बोरसे, रत्‍नाबाई अहिरे, रंजनाबाई शिंदे यांनी उमंग परिवाराचे आभार व्यक्त करीत धन्यवाद दिले. अत्युंत खेळीमेळीच्या वातावरणात समारंभ संपन्न झाला. महीला भगिंनिनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.