किरकोळ कारणावरून वरणगाव येथे एकाचा खून ; आरोपी ताब्यात
वरणगाव ;- दर्यापूर शिवारातील गणेश नगर मधील एका वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरून आयुध निर्माणीच्या कर्मचार्याने जि . प . पाणी पुरवठा कर्माचाऱ्याच्या डोक्यात, मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करून खुन केल्याची घटना दि १४ रविवार रोजी सकाळी पाऊने दहा वाजेच्या सुमारास घडली
या बाबत पोलीसांनी दिलल्या माहीती असे की वरणगाव शहरातील शिवाजी नगर मधील रहिवाशी प्रमोद ज्ञानेश्वर महाराज ( ५५ ) हे रविवार च्या सकाळी दर्यापुर शिवारातील गणेश नगर मधील एका वडापावच्या दुकाना समोर खुर्च्या अस्ताव्यस्त करीत होते त्या वेळी दिपक कृष्णाकुमार सिंग तेथे येऊन खुर्च्या का फेकत आहे असा जाब विचारताच त्या दोघात शाब्दीक बाचाबाची झाली हे सुरु असताना तेथे उपस्थीत असणाऱ्यानी त्यांच्यात मध्यस्थी करून भांडण मिटवित तेथुन निघुन गेले मात्र थोड्याच वेळाने दिपक सिंग घरी जाऊन लाकडी दांडा घेऊन आला व पुन्हा प्रमोद महाजन त्याच वडापावच्या दुकानात वडापाव खात असताना पाठी मागुन येऊन दिपक याने हातातील लाकडी दांड्याने प्रमोदला डोकावर ,मानेवर , व पाठीवर जबर बेशुद्ध होई पर्यत मारहाण करून तेथुन निघुन गेला तर प्रमोद खुर्चीतच बेशुद्ध आवस्थेत असतना मनोहर ओंकार महाजन (प्रमोदचे चुलत भाऊ ) हे घटना स्थाळावर आले व प्रमोदला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरानी त्यांना तपाणीअंती मृत घोषीत केले
मारहाण केल्या नतंर दिपक सिंग हा घटना स्थाळा वरून पसार झाला होता मात्र या घटनेची माहीती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ , उप निरिक्षक परशुराम दळवी , उप निरिक्षक इस्माईल शेख , पो .हे . कॉ . नागेंद्र तायडे , कॉ विजय बाविस्कर , कॉ योगेश पाटील यांनी घटना स्थळाकडे धाव घेऊन पसार झालेला दिपक याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मनोहर ओंकार महाजन यांच्या फिर्यादीवरून आयुध निर्माणी कर्मचारी दिपक कृष्णा कुमार सिंग यांच्या विरोधात भा द वी कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गर्शनाखाली सह पो निरिक्षक आशिष आडसुळ हे करीत आहे