“जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात…” प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गोड आणि लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हि तिच्या अभिनयाइतकीच तिच्या हास्यातील अनोखेपणासाठी ओळखली जाते. प्रार्थना विवाहित आहे आणि ती चित्रपटसृष्टीसह मालिका विश्वासाचा देखील एक भाग आहे. सध्या झी मराठीवर तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. तशी प्रार्थना विविध लूक, प्रोजेक्ट आणि फोटोंसाठी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. पण यावेळी मातृत्वावरील एक भावनिक पोस्ट केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडिया स्टोरीवर एक फोटो शेअर करत तिने मनातील अव्यक्त भावना व्यक्त केली आहे असेच भासत आहे.
हि पोस्ट शेअर करताना यामध्ये तिने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो म्हणजे रस्त्यावर लिहिण्यात आलेली एक पाटी आहे. मात्र या पाठीवरचे शब्द मनात घर करणारे आहेत. असेच हे शब्द प्रार्थनाच्या मनालाही भावले आहेत. या पाटीवर असं लिहिलंय कि, ‘जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात तेव्हा खरं तर तुमची स्थिती वयाच्या विशीत असल्यासारखीच असते. फक्त त्यावेळी तुमच्याकडे पैसे असतात.’
हा फोटो पोस्ट करत प्रार्थनाने ‘हे अगदी खरंय’ असे लिहिले आहे. यावरून हे शब्द आणि त्या शब्दातील भावना प्रार्थनाच्या मनावर काहीतरी कोरून गेल्याचे समजते. एका स्त्रीसाठी आई या शब्दातील भावना काही औरच असते. कदाचित म्हणून या पाठीवरील शब्द प्रार्थनाला भिडले असावेत.
कलाकारांचे लग्न, कुटुंब, मित्र मैत्रिणी याशिवाय प्रेग्नंन्सी आणि मुलं याबाबत चाहते फारच उत्सुक असतात. त्यामुळे तू आई कधी होणार असा प्रश्न फार सहज विचारला जातो. अलीकडेच प्रार्थना ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात दिसली होती. यावेळी तिला ‘तू आई कधी होणार’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने ‘माझ्या सासूबाईही हा शो बघतात. मी काही वाईट काम करते का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना.. हा विषय नको. मला खूप बाळं आहेत. आमच्याकडे ५ पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, २ उंदीर आहेत. अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे.’ हा प्रसंग आठवता बहुतेक याच प्रश्नाने त्रासलेलं प्रार्थनाचं मन या पोस्टमधुन व्यक्त झालं असेल.