DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

धक्कादायक ; पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा  । प्रतिनिधी 

तालुक्यात सावखेडा बु येथे आज पहाटे झोपेत असलेल्या बायकोचा गळा आवळून ठार केल्यानंतर माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला पँटने गळफास घेत नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. सावखेडा बु” येथे गुरुवारी रात्री सतिष धनसिंग परदेशी (वय – ३८), गायत्री परदेशी (वय – ३२), ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह हे संपूर्ण कुटुंब झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सतिष परदेशी याने गाढ झोपेत असलेल्या आपली पत्नी गायत्रीचा गळा दाबून ठार केले. नंतर तो घराबाहेर आरडाओरड करून पळत असतानांच शेजारी राहणारा लहान भाऊ संदिप परदेशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने सतिषला पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करीत आहेस? अशी विचारणा केली त्यावर सतिषने सांगितले की, तू मला का अडवतो , मी पत्नी गायत्रीचा गळा दाबून खून केला आहे. संदिपने घरात जाऊन बघितले तेंव्हा गायत्री मृत अवस्थेत आढळली तर दोघे मुले झोपलेले होते.

नंतर सतिष परदेशी याने गावाबाहेर जाऊन माजी सरपंच गोकुळसिंग परदेशी यांच्या शेतात पळसाच्या झाडावर चढत अंगातल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्याभोवती गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही वार्ता गावभर पसरल्यानंतर सतिष याचा शोध सुरू झाला. गावातीलच संजय सोनवणे सकाळी शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतिषचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी पत्नीस ठार करून स्वतः गळफास घेणारा इसम वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. घटनास्थळी पिंपळगाव (हरे.)चे स पो नि कृष्णा भोये, स फौ विजय माळी, हवालदार दिपकसिंग पाटील, संदिप राजपूत, दिपक अहिरे यांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.
सतिष परदेशी व संदिप परदेशी यांचे वडील धनसिंग परदेशी यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. शनिवारी सावखेडा येथून त्यांच्या अस्थी नासिक येथे नेण्यात येणार होत्या. दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन असल्याने सतिष व त्याचे कुटुंब लवकर उठून तयारी करण्यासाठी रोजच्या वेळेपेक्षा लवकर झोपले होते.

पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्यात खुनाचा व आत्महत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे तपास स पो नि कृष्णा भोये , स फौ विजय माळी करीत आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.