DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पहूर पोलिसांचा दणका; दुचाकी चोर जेरबंद

पहूर : जळगाव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग बापू रोहम यांनी पहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले होते.

त्यानुसार पहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी आकाश सुभाष गुजर (वय २८, रा. नांदनखेडा, ता. जामनेर) याला ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. हस्तगत केलेल्या वाहनांमध्ये १५ हजार रुपये किमतीची हिरो फॅशन प्रो (क्र. एमएच-१९-बीव्ही-८८९९) आणि २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (क्र. एमएच-१९-डीके-४०१३) यांचा समावेश असून, एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, राहुल पाटील, पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास गायकवाड व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत सोनवणे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.