यावलमध्ये देशी कट्टा घेऊन फिरणारा पोलिसांच्या जाळ्यात
यावल : यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव, ता. यावल, जि. जळगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी व गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पवन सोनवणे हा स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून कारवाई केली.

पोलिसांनी संशयिताकडून एक देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५(१-ब)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता दाखल करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. DocScanner 4 Oct 2026 3-32 pm
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्यात सुरू आहे.