जळगाव जिल्ह्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम
निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाई; १३७ गुन्हे दाखल, १३७ आरोपींवर कारवाई
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील विविध भागांत एकाचवेळी ही मोहीम राबविण्यात आली. प्रेस नोट क्र. 166 विशेष मोहिम-1
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित अधिकारी व अंमलदारांनी विशेष पथकांच्या माध्यमातून कारवाई केली. या कारवाईत अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, रसायने, साहित्य तसेच तयार करण्यात आलेली अवैध दारू जप्त करण्यात आली. गावठी दारू निर्मितीची ठिकाणे, विक्रीची ठिकाणे आणि अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवरही कारवाई करण्यात आली. प्रेस नोट क्र. 166 विशेष मोहिम-1

१३७ गुन्हे; १३७ आरोपींवर कारवाई
पोलिसांच्या विशेष मोहिमेत एकूण १३७ गुन्हे दाखल करून १३७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान सुमारे ४०६९ लिटर गावठी दारू, ४७८६ लिटर रसायन तसेच ३९० नग विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३२ लाख २५ हजार ३६० रुपये असल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे. प्रेस नोट क्र. 166 विशेष मोहिम-1
सप्टेंबरमध्येही मोठी कारवाई
दरम्यान, सप्टेंबर २०२६ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात अवैध दारूविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. या कालावधीत २,५२२ आरोपींविरुद्ध एकूण २,५०६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रेस नोट क्र. 166 विशेष मोहिम-1
अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांबाबत नागरिकांना काही माहिती मिळाल्यास ती जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रेस नोट क्र. 166 विशेष मोहिम-1
या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकांनी सहभाग घेतला.