DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

पुणे : वृत्तसंस्था 

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चागले म्हणावे लागेल. सर्व राज्यांसाठी हे चांगलं आहे, असे सुळे यांनी म्हंटले.

सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राजकीय विषयामध्ये कोणाला एकत्रित जर काम करायचे असेल तर समविचारी पक्ष एकत्रित येत असेल आणि त्यांनी एकत्रित आले तर ती सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. आणि विकास या कामासाठी जर सर्वजण एकत्र येणार असतील तर त्यातून जर राज्याचे चांगले होणार असेल तर तर ती चांगलीच गोष्ट आहे कुणासाठी आणि कुठल्याही राज्यासाठी, असे सुळे यांनी म्हंटले.

दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडी सरकारला प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आलेल्या विधानावरून आता भाजपश इतर पक्षांकडून या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.