मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. मात्र अशातच राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका जाणवत तर कुठे ढगाळ वातावरणात आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दुसरीकडं मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान 15 अंशावर गेले आहे. त्यामुळं मुंबईतही थंडी वाढली आहे. तर थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचे किमान तापमान 18 अंश आहे. मुंबईत सध्या माथेरानपेक्षाही अधिक थंडी वाजत आहे.