DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुचाकी लंपास

चोरट्यांचा सुगावा लागेना; घटना थांबेना....

जळगाव : प्रतिनिधी 

शहरात दुचाकी चोरट्याचा धुमाकूळ सुरूच असून जोशीवाडा, नवीन बसस्थानक आणि प्रभात कॉलनी चौक येथून एकूण तीन दुचाकी लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी, जिल्हापेठ व रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मेहरूण येथील जोशी वाड्यातील रहिवासी दिलीप भगवान कोळी यांची एमएच १९ बीई १७९७ क्रमांकाची दुचाकी त्यांच्या घरासमोरून १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत बुधवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मनपा सफाई कामगार अनिल विकास गोयर (रा. शनीपेठा यांनी ६ मार्च रोजी रात्री १०. वाजता नवीन बसस्थानकातील

स्वच्छतागृहाजवळ त्यांची दुचाकी (एमएच १९ डीएम ४०२७) उभी केली होती. रात्री कुणी तरी चोरट्याने दुचाकी चोरून नेली. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर प्रभात कॉलनी चौकातील पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या वॉल कंपाउंडजवळून जितेंद्र प्रकाश राजपूत (रा. बेटावद) यांची एमएच १९ बीवाय ५६८२ क्रमांकाची दुचाकी चोरट्याने ७ मार्चच्या मध्यरात्री चोरून नेली. ८ मार्चला ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद घाली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.