DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात प.पु. ब्रम्हऋषीवर किरीटभाईंची भागवत कथा

जळगाव | प्रतिनिधी
प.पु. ब्रम्हऋषीवर किरीटभाई महाराज यांचे ६ ऑक्टोबर ते .१२ ऑक्टोबर मध्ये पितृपक्ष काळात सागरपार्क येथे भागवत कथेचे आयोजन दुपारी ३ ते ७ वाजेदरम्यान करण्यात आलेले आहे. अशी माहिती आ.राजू मामा भोळे यांनी दिली.
यावेळी आयोजक सुजित चौधरी, सुनिल चौधरी, विशाल भोळे, पियुष कोल्हे,तुलसी परिवार सदस्य उपस्थित होते.
या भागवत कथेमध्ये भागवत कथे सोबत वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आलेले असून त्याची माहिती खालील प्रमाणे.

६ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान शोभायात्रा
प्रथम दिवस :- गुरूपादुक पुजन, गणेश पुजन
व्दितीस दिवस :- मंगळागौरी पुजा हळदी कुंकू.
तृतीय दिवस :- श्रीकृष्ण जन्मोत्सव
चतुर्थ दिवस :- दही हंडी, मनोरथ, यमुना लोटी मनोरथ, सुदामा मिलन
पंचम दिवस :- महारास, पृष्टीमार्गमनोरथ, सांझी उत्सव गोवर्धन पूजा
षष्ट दिवस :- कृष्ण रुक्मीनी विवाह
सप्तम दिवस :- पूर्णाहुती
सदर भागवत कथेमध्ये ज्ञान यज्ञसोबत सातदिवसीय पितृमोक्षीय हवन आणि पुर्वजांच्या नावाने पोथीस्थापनाचे नियोजन करण्यात आलेले आहे व नेमिश्यारण्य मथुन सप्त्म वैदीक ब्राम्हणाव्दारे यंज्ञ व पुजा विधी होणार आहे ज्यांना या पुजेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा (९७०८७०७००)
भागवत कथा सागरपार्क येथे आयोजित केली असून तेथे भव्य मोठा मंडप जर्मन डोम टाकण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास दररोज अंदाजे १०हजारावर भाविक येण्याची शक्यता असून त्यासाठी विविध समित्यामध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना बाराकोड पास दिले जातील. सदर भागवत कथेच्या आयोजनासाठी आ.राजुमामा भोळे यांचे अनमोल सहकार्य लाभत असून माजी महापौर ललीत कोल्हे यांचेसुध्दा मोलाचे सहकार्य मिळत आहे. कार्यक्रमाचे आयोजक सुजित चौधरी, सुनिल चौधरी, विशालभाऊ भोळे, पियुष भाऊ कोल्हे,तुलसी परिवार, युवक एकता मित्र मंडळ आणि लालबाग मित्र मंडळ यांचे तर्फे जळगाव जिल्हातील नागरिकांनी भागवत कथेचा लाभ घ्यावा या बाबत आवाहन केलेले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.