अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अमळनेर ;- फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सर्व विभागाच्या समित्या नेमून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी संमेलनाचा आढावा घेताना दिले.
२ ते ५ फेब्रुवारी दरम्यान अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात अ भा मराठी साहित्य संमेलन होत असून त्यासंदर्भात जागा पाहणी व नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अमळनेरात आले होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड , उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , व्हॉ चेअरमन प्रदीप अग्रवाल ,संचालक योगेश मुंदडा , नीरज अग्रवाल , हरी भिका वाणी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी , प्राचार्य डॉ ए बी जैन, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे , अभियंता हेमंत महाजन यांच्यासह मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य हजर होते.
यावेळी जितेंद्र देशमुख , माधुरी पाटील , वसुंधरा लांडगे , मराठी विभाग प्रमुख प्रा रमेश माने , प्रा शिला पाटील , भैया मगर , संदीप घोरपडे ,नरेंद्र निकुंभ , रमेश पवार ,अमोघ जोशी हजर होते.