DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, टाळमृदंग अन्‌ ढोलताश्‍यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने दिंडीस प्रारंभ

 अमळनेर : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, शंखनाद, टाळमृदंग अन्‌ ढोलताश्‍यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्‍वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

शुक्रवारी, २ फेबु्रवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीस सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह सुमारे ४ हजार सारस्वतांच्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. दिंडी जशजशी पुढे पुढे जात होती तस तशी दिंडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. त्यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच द्विगुणीत झाला होता.

ग्रंथदिंडीच्या मार्गापासून तर दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक, स्टेट बँक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनीही दिंडीत सहभाग घेत एक किलो मीटर अंतर पायी चालले. तसेच मंत्री गिरीष महाजन यांनी दिंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

दिंडीत होता या संस्थानांचा सहभाग

दिंडीत सहभागी झालेल्या संस्थानामध्ये केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगाराम सखाराम शाळा, द्रो. रा. कन्या शाळा, प्रताप हायस्कूल, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपरिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, विजय नाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनियर कॉलेज अमळनेर, सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषद सर्व कर्मचारी अमळनेर, मराठी वाड:मय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, पोलीस प्रशासन, प्रांताधिकारी, महाराष्ट्र मतदान विभाग, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माधमिक कॉलेज यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.