DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास…’ विशेष अभियान

जळगाव – अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी शनिवारी १० रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची यांची व्याख्याने, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर आमची श्रद्धा…. स्वच्छता आमचा ध्यास.. हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध ठिकाणची मंदिरे व परिसर स्वच्छ केला जाणार आहे.

विविध ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन
प्रसिद्ध व्याख्याते राहूल सोलापूरकर यांचे १९ रोजी चाळीसगाव येथील तेली समाज मंदिर कार्यालय येथे सायंकाळी ७ वाजता ‘शिवरायांचे व्यवस्थापन व व्यापार शास्त्र या विषयावर, २० फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील स्वामी लॉन येथे सायंकाळी ७ वाजता ‘प्रताप गडाचे मंत्र युद्ध’ या विषयावर, २१ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, मायादेवी नगर येथे ‘श्रीराम मंदिर अयोध्या, इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर तर २३ रोजी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे ‘श्रीराम मंदिर अयोध्या, इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होईल. यासह ११ रोजी पारोळा येथील मोठा महादेव चौकात सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. प्रसिद्ध खंजिरी वादक रामपाल महाराज यांचे सामाजिक जागृतीपर कीर्तन होईल. तसेच १२ रोजी सायगाव ता. चाळीसगाव येथील श्रीराम मंगल कार्यालय परिसरात सायंकाळी ७ वा.. २६ रोजी कजगाव येथे तर २७ फेब्रुवारी रोजी शहरातील मेहरूण परिसरात कीर्तन होईल. यासह धरणगाव येथे १८ रोजी तर २५ रोजी जळगाव येथे मेहरूण परिसरात आरोग्य शिबिर होणार आहे.

भाजपकडून जळगाव लोकसभेसाठी इच्छूक
भाजपकडून संधी मिळाल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असून त्यादृष्टीने या लोकसभा मतदारसंघात आपण संपर्क अभियान व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेत आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.