DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल

सीआयएससीई बोर्डच्या निकालात १२ वीत क्रिषा राठोड तर १० वीत वेद भुसकाडे प्रथम

जळगाव : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२ वीत क्रिषा राठोड तर दहावीत वेद जयंत भुसकाडे प्रथम आले आहेत.

दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकालात घवघवीत यश संपादित केले. क्रिषा राठोड हा ९५.०० टक्के गुणांसह पहिली आली आहे. तर आरोही रघुनाथ परांजपे ९३.२५ टक्के गुणांसह द्वितीय तर शाल्मली शैलेंद्र अलमन ९२.२५ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यामध्ये ९० टक्यांच्यावर सहा तर ८० ते ९० टक्क्यांमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आयसीएसई (दहावी) मध्ये प्रथम क्रमांकाने वेद जयंत भुसकाडे याला ९६.८० टक्के गुण प्राप्त झाले आहे. त्याला रोबोटिक आणि एआयमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळाले. तर दिग्विजय संजय मोरे यांने ९५.४० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला. त्याने इंग्रजी साहित्य विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आहे. अनुष्का अशोक महाजन हिला ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. याशिवाय जयेश केडीया या विद्यार्थ्यांनी इतिहास विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहे. त्याशिवाय ९० टक्क्यांच्यावर नऊ विद्यार्थी तर ८० ते ९० टक्क्यांदरम्यान १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही भविष्याशी निगडीत अनुभवाधारीत शिक्षण देणारी स्कूल आहे. सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील पहिलीच शाळा आहे. परस्परांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातात. छंद जोपासत वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रमांमध्ये कौशल्य दाखवित विद्यार्थीही यश संपादित करतात.

भविष्याचे वेध घेत असताना शैक्षणिक अभ्यासक्रमासह आपल्यातील सूप्त कलागुणांना जोपासून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलचे संचालक मंडळ, अशोक जैन, अतुल जैन, निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

“श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक मूल्य जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकाल राखला. या सुयशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन! देशाचे उज्जवल भविष्य विद्यार्थ्यांमध्ये असून निसर्गरम्य वातावरण, स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची ताकद अनुभूतीच्या विद्यार्थ्यांत आहे.”
श्री. अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.