DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीचा निकाल 13 मेच्या आतच

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील तब्बल 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. राज्य मंडळाकडे 21 लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी उपलब्ध झाले आहेत. अपार आयडी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये पाहता येणार आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करून राज्य मंडळ निकालाची डेडलाइन पाळणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर घेण्यात आल्या. परीक्षा सुरू असतानाच पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले.

गेल्या वर्षापासून दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात ेत आहेत. त्यामुळे हे गुण देखील वेगाने राज् मंडळाला प्राप्त झाले आहेत. राज्य मंडळाच्या अधिकार्‍यांकडून विभागीय मंडळे तसेच शाळा-महाविद्यालयांकडे निकालाच्या कामासंदर्भात सतत पाठपुरावा करण्यात आला. यावर्षी शिक्षकांनी देखील पेपर तपासणीवर बहिष्कार घातला नाही. त्यामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया वेगवान पद्धतीने पूर्ण झाली आहे.

गेल्या काही वर्षांत बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात आहे. परंतु, यंदा पहिल्यांदाच दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल 13 मेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. बुधवारी 30 एप्रिलला कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात सीआयएससीई मंडळाचा निकाल जाहीर झाला आहे.

 

डिजीलॉकरमध्ये मिळणार दहावी-बारावीचा निकाल

राज्य मंडळाने दहावी-ारावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी कळवावेत, असे शाळा-महाविद्यालयांना आवाहन केले होते. त्यानुसार दहावी-बारावीला बसलेल्या तब्बल 31 लाख विद्यार्थ्यांपैकी 21 लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी राज्य मंडळाला प्राप्त झाले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या डिजीलॉकर अ‍ॅपमध्ये निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अन्य विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळांवर निकाल पाहता ेणार आहे. अपार आयडी असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल कामस्वरूपी त्यांना थेट डिजीलॉकर अ‍ॅपमध्ये उपलब्ध होणार असल्याने संंधित विद्यार्थ्यांना त्याचा भविष्यात कोठेही उपयोग करता येणार आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.