चक्रीवादळ ‘एरिन’चा वेग वाढला; किनारपट्टीवर हाय अलर्ट
वाऱ्यांचा वेग ताशी १०० किमी पार, १६० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता
अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असून आजची रात्र धोकादायक ठरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत हे वादळ अधिक तीव्र होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सात दिवस मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे.
वादळाचा वेग प्रचंड
शुक्रवारी रात्री ८ वाजता वाऱ्यांचा वेग ८५ किमी प्रतितास होता. काही तासांतच हा वेग १०० किमी प्रतितास झाला. तज्ज्ञांचा इशारा आहे की वेग १६० किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. या वेगाने वादळ गेल्यास मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची शक्यता आहे.
‘एरिन’वर राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राचा इशारा
अमेरिकेच्या NHC (National Hurricane Center) ने कळवले आहे की, रविवारपर्यंत ‘एरिन’ अती तीव्र चक्रीवादळ बनेल. सध्या ते लीवर्ड बेटांच्या उत्तरेला सरकत असून, पुढील २४ तासांत अँगुइला, सेंट मार्टिन, सेंट बार्थेलेमी, साबा, सेंट युस्टाटियस आणि सिंट मार्टिन या बेटांवर उष्णकटिबंधीय वादळाची स्थिती निर्माण होईल.
धोक्यातील क्षेत्रे
- उत्तर लीवर्ड बेटे, व्हर्जिन बेटे आणि प्यूर्टो रिको – वादळ सर्वाधिक जवळून जाण्याची शक्यता
- टर्क्स आणि कैकोस तसेच आग्नेय बहामास – सतर्कतेचा इशारा
- फ्लोरिडा ते न्यू इंग्लंड आणि अटलांटिक कॅनडा किनारपट्टी – उंच लाटा व धोकादायक रिप करंट्स
प्यूर्टो रिकोवर संकट गडद
तज्ज्ञांच्या मते, प्यूर्टो रिकोच्या उत्तरेवरून जाताना ‘एरिन’ आणखी भीषण होईल. रविवारी तिथे ढगफुटीसमान पाऊस, ५० किमी/ताशी वेगवान वारे आणि भूस्खलनाचा धोका आहे. या हंगामात १८ वादळे येतील, त्यापैकी ५ ते ९ चक्रीवादळात परिवर्तित होतील, असा अंदाज आहे.
हवामान खात्याचा इशारा
किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, घराबाहेर न पडता सुरक्षित स्थळी राहावे, अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे.