ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात
जामनेर : प्रतिनिधी
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सुद्धा देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन माजी राष्ट्रपती असुन ते देशातील शिक्षकांसाठी एक प्रशंसनीय गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीत शिक्षकांना अगम्य स्थान असुन ते पुज्यनीय तथा शिक्षक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. “आचार्य देवो भव” अर्थात त्यांना देवाचा दर्जा दिला जातो तर कारण वाढत्या मुलांनी त्यांच्या पालकांपेक्षा जास्त वेळ घालविला असतो. चांगले संस्कार व उत्तम शिक्षण कोण देऊ शकतो तर शिक्षक असतो. त्यांच्या सान्निध्यात तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो देशाचा भावी नागरिक असुन विद्यार्थ्यांवर उत्तम प्रभाव टाकु शकतात.याच दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील केकतनिंभोरा येथील दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचालित ओशन इंटरनॅशन, स्कूल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या संचालिका लक्ष्मी वायकर यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सीमा श्रोत्रिया उपमुख्याध्यापिका सूचिता सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थाना शिक्षण व शिक्षक यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी – शिक्षकाची उत्तम भूमिका सादर केली. तर काही, विद्यार्थ्यांनी शिक्षिका कोमल शिंदे, संजना सोनी, नितु शर्मा श्रुती जोशी, सुवर्णा कोळी यांना शिक्षक दिनानिमित्त भेटवस्तु दिल्या. कार्यक्रमाच्या नंतर शिक्षिका-वर्ग कर्मचारी यांना अल्पोपाहार देण्यात आला. तसेच सर्व शिक्षिका खेळ खेळून शिक्षकांनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.