डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये खेळांचा जल्लोष!
जळगाव : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या वतीने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव येथे आजपासून क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण सुरुवात झाली. विद्यार्थीनींमध्ये जोश, उमेद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संघांची नोंदणी करण्यात आली. सहभागी विद्यार्थिनींसाठी स्वादिष्ट नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धास्थळी आकर्षक मंच सजावट, प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी, मजेशीर सेल्फी पॉईंट, सोयीस्कर हेल्प डेस्क आणि तत्पर प्रथमोपचार सुविधा या सर्व व्यवस्थेमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
कॉलेज प्रशासन, शिक्षकवर्ग आणि स्वयंसेवकांनी मिळून या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले असून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
दिवसभर विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी विद्यार्थिनींच्या कौशल्याचा आणि टीम स्पिरिटचा मनमोकळा आविष्कार पाहायला मिळणार आहे.