DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगावमध्ये नेफ्रोलॉजिस्ट सेवा सुरू

किडनीसाठी अत्याधुनिक उपचार उपलब्ध

जळगाव : शहरातील नागरिकांना उत्कृष्ट आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, विद्यानगर आकाशवाणी चौक येथे असलेल्या महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे आता नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून किडनीशी संबंधित विविध आजारांचे निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापन एका छताखाली उपलब्ध झाले आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे किडनीचे आजार वाढत चालले आहेत. चुकीचा आहार, पाणी कमी पिणे, रक्तदाब व मधुमेह यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किडनीवर ताण येतो आणि गंभीर समस्या निर्माण होतात. अशा रुग्णांसाठी अनुभवी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये विशेष सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सेवा:

  • मुतखडा (किडनी स्टोन) उपचार

  • लघवी कमी होणे, सूज येणे, रक्तदाब नियंत्रणातील अडचणी

  • डायलिसिस सेवा

  • दीर्घकालीन किडनी रोग व्यवस्थापन

  • ट्रान्सप्लांटपूर्व व ट्रान्सप्लांटनंतर सल्ला व तपासणी

रुग्णांच्या सोयीसाठी येथे अत्याधुनिक डायलिसिस युनिट, आधुनिक तपासणी उपकरणे आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल टीम कार्यरत आहे. तसेच, २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांनाही त्वरित उपचार मिळू शकतात.

महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने जळगाव व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याचा संकल्प केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, किडनीशी संबंधित खालील लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

  • सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती, चेहरा व पायांवर सूज

  • भूक न लागणे, उलटी होणे, मळमळ

  • रात्री वारंवार लघवी होणे

  • कमी वयात उच्च रक्तदाब

  • थकवा, दम लागणे, लवकर थकणे

  • सहाव्या वर्षानंतरही बिछाना ओला करणे

  • लघवीच्या वेळी जळजळ, रक्त किंवा पू येणे

  • लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा थेंब-थेंब लघवी होणे

  • पोटात गाठ येणे, पाय व कंबरदुखी

वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास किडनीच्या आजाराची शक्यता गृहित धरून तपासणी करणे आवश्यक आहे.

डॉ. अभय जोशी – किडनी विकार तज्ज्ञ, महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव
“उत्तम आरोग्याची सुरूवात आमच्यापासून” या ब्रीदवाक्यानुसार महादेव हॉस्पिटल सतत रुग्णसेवेसाठी तत्पर आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.