DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

निमखेडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून

दोन आरोपी अटकेत, जळगाव तालुका पोलिसांची कारवाई

जळगाव – तालुक्यातील निमखेडी गावात अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मयताचे नाव सागर साहेबराव सोनवणे (वय ३०, रा. निमखेडी ता. जि. जळगाव) असे आहे. ही घटना दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास निमखेडी गावातील राम मंदिरासमोर घडली. या घटनेची नोंद दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३.५१ वाजता पोलीस स्टेशन डायरीत करण्यात आली.

फिर्यादीच्या माहितीनुसार, सागर सोनवणे याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच कारणावरून आरोपी संदीप छगन बाविस्कर व अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे (दोघेही रा. निमखेडी, ता. जि. जळगाव) यांच्या मनात राग होता. त्या रागातून दोघांनी संगनमताने सागर सोनवणे यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुठल्यातरी जड वस्तूने त्याच्या डोक्यावर प्रहार करून गंभीर दुखापत केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) व ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक २ विशाल साहेबराव सोनवणे यास रात्री २०.४९ वाजता, तर आरोपी क्रमांक १ संदीप छगन बाविस्कर यास दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ०५.२३ वाजता अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील, जळगाव तालुका पोलीस ठाणे, हे करीत असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.