DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

समृद्धीवर चालक सिनेमा पाहत असलेली ती बस जप्त ; जळगाव आरटीओची कारवाई

जळगाव ;- समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा चालक मोबाइलवर सिनेमा पाहत ट्रॅव्हल्स (एमएच १९ सीएक्स ५५५२) चालवत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला होता. ही बस जळगावच्या संगितम ट्रॅव्हल्सची असल्याचे स्पष्ट झाले. आरटीओ कार्यालयाने तातडीने कारवाई करत ही बस ताब्यात घेतली आहे.

या चालकाला पुणे आरटीओ कार्यालयात हजर करण्यात आले. रविवारी समाज माध्यमांवर लक्झरी बस चालवताना कानात हेड फोन टाकून सिनेमा पाहत चालक धोकादायक पद्धतीने बस चालवतअसल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. ही बस संगीतम् ट्रॅव्हल्सची असून ती मंगळवारी ताब्यात घेण्यात आली. संगितम ट्रॅव्हल्स कंपनीला नोटीस बजावून परवान निलंबनाबाबत खुलासा मागवण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोह यांनी सांगितले

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.