DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तरुणाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर ;- दुर्धर आजाराला कंटाळून पुरनाड येथील ३४ वर्षीय तरूणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक अशोक इंगळे (वय-३४) रा. पुरनाड ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, दिपक इंगळे हा आपल्या नातेवाईकसह मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे राहात असून तो मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. . गेल्या काही महिन्यांपासून त्याला दुर्धर आजार जडला होता. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपासून तो घरीच होता. त्यात त्याला या दुर्धर आजारामुळे अतिशय त्रास होत होता. त्यामुळे या आजाराला कंटाळून मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री दीड ते सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा करण्याच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक धमेंद्र ठाकूर करीत आहे.
==============

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.