DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन

जळगाव ;- येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी अपार पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन ,सहाय्यक फौजदार अतुल वंजारी ,पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण नाईक यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदी उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात यावेळी जल्लोष करण्यात आला.. गणरायाच्या आगमनामुळे पोलीस स्टेशन आवारात सर्वामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.