DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कुसुम्ब येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;– एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार तालुक्यातील कुसुंबा येथे आज रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आईवडील आणि लहान बहिण राहायला असून त्याच्या वडिलांचे गॅरेजचा व्यवसाय आहे. तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेजस हा आईवडील आणि बहिण यांच्यासोबत जेवण केले. आणि झोपण्यासाठी ते वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत गेला. दरम्यान, मध्यरात्री त्याने सुताची दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉ. सदाब सय्यद करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.