DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खूनाच्या गुन्ह्यातील बंदीचा कारागृहातून पलायन करताना पकडले

जळगावः – खूनाच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून कारागृहात बंदी असलेल्या विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अवघ्या काही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पकडण्यात आले. त्या बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामानंद नगर परिसरात निवृत्ती काशिनाथ पवार हे कारागृहात शिपाई म्हणून नोकरीस आहे. कारागृहात गेल्या दीड वर्षांपासून खूनाच्या गुन्ह्यात विजय चैत्राम सावकारे हा बंदी म्हणून कोठडीत आहे. शनिवारी सकाळी ते संदीप अर्जुन थोरात, दिनेश दत्तू बारी, नागनाथ सुदाम येईल्वाड हे तिघे कर्मचारी कारागृहाच्या मेन गेटवर ड्युटीवर होते. साडेआठ वाजेच्या सुमारास कारागृहाचा दरवाजा बाहेरुन कोणीतरी ठोठावला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले, परंतु त्यांना कोणीही दिसून न आल्याने त्यांनी दरवाजा उघडून बघितले. याचवेळी कारागृहातील बंदी विजय सावकारे याने पोलिसाला धक्का देवून तो कारागृहाच्या मेनगेटमधून पळून गेला.

 

प्रवेद्वारावर आवळल्या बंदीच्या मुसक्या

पोलिस कर्मचाऱ्याने आरडाओरड करीत पळालेला बंदी विजय सावकारे पाठलाग केला. याचवेळी कारागृहाकडे येत असलेले कारागृह शिपाई अनंत केंद्रकर व गणेश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यप्रवेद्वारावर बंदीला पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा त्याची कारागृहात रवानगी
केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.