DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी केली बेदम मारहाण

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीमध्ये नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी महाबळ परिसरातील संभाजी चौकात घडली. याप्रकरणी सोमवारी दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विवेक कॉलनीमध्ये आनंद श्रीकृष्ण जंजाळे ऊर्फ नाव नाऱ्या (वय २६) हा वास्तवायस आहे. रविवारी रात्री संभाजी चौकात दुर्गा देवीच्या मिरवणुकीत नाचत असताना आकाश राठोड (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. समतानगर याने मुद्दामाहून नायला नाचतांना धक्काबुक्की केली. त्यावर दोघांमध्ये वाद झाला होता. दरम्यान, नाचतांना थकल्यामुळे आनंद उर्फ नाऱ्या जंजाळे हा एका किराणा दुकानाजवळ बसलेला होता. काहीवेळानंतर आकाशसह देवा राठोड (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. समतानगर हा त्याठिकाणी आला. दोघांनी आनंदला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तू आमच्या नांदी का लागतो असे म्हणत तुला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

 

आकाशने लाकडी दांड्याने उजव्या कानावर, डोक्यावर मारून दुखापत केली तर देवाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेतील जंजाळे यांना त्यांचे मित्र संजू सुरवाडे व दिनेश बोदडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमीने मंगळवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.