पाळधीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचे सांत्वन
जळगाव : मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांचे निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पाळधी येथील घरी आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांच्या मातोश्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. यावेळी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्व सदस्य तसेच ना.अनिल पाटील, आ.चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची आस्थेवाईक चर्चा करुन मातोश्रींच्या निधनाचे दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्री गावात आल्याने घराबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.