DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिद्द, ध्येय, संघर्ष ते यशस्वी यांचा संगम म्हणजे आदरणीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील

ध्येयवेड्या माणूस काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील. मुक्ताईनगर मतदारसंघाचे दमदार आमदार समजले जाणारे लाडके चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या ध्येयवेड्या प्रामाणिक जिद्दीला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम माझा सलाम.

आपण एका आशा ध्येयवेड्या माणसासोबत काम करत आहे. ज्यांना थांबन माहीत नाही, अविश्रांत आणि अविरत मेहनत करणं हेच जणू आपलं जीवितकार्य आहे असं समजून गोरगरिबांना मदतीसाठी सदैव कार्यरत राहणारे व्यक्तिमत्त्व. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे आदरणीय भाऊ.

 

विषय थोडा मागील काळातील आहे. काळ खूप भयंकर होता. ज्यावेळी आपले आपल्यांना ओळखत नव्हते त्यावेळी हेच हाच संघर्षयोद्धा मैदानावर प्रत्यक्षात ठाण मांडून होता. आदरणीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील जुन्या हॉस्पिटल बिल्डिंगचे काम पाहण्यासाठी गेले असता तेथे आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वार्डमध्ये घेऊन चला, मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे अस यावेळी भाऊंनी सांगितले. कदाचित भाऊंना अचानक विचार आला असेल, आपण कोविड वार्ड मध्ये जाऊया, तिथे किती रुग्ण आहेत..? त्यांना काही समस्या आहेत का..? मला त्यांना सक्षम भेटायचं आहे.

लागलीच मुक्ताईनगर येथील कोविड सेंटरला जाऊन कोरोना झालेल्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये प्रत्यक्ष भेटुन लढाईसाठी आधार देऊन, आदरणीय भाऊ याठिकाणी भेट देत असतांना जेवणाची समस्या आहे का.? गोळ्या व औषध वेळेवर भेटत आहे का.? असे एक ना अनेक प्रश्न विचारत बिनधास्तपणे बोला, मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे. घाबरू नका असे सांगत प्रत्येकाला आदरणीय भाऊ या ठिकाणी आश्वास्त करत होते. कोरोनाला घाबरू नका, योग्य उपचार चालू आहेत, तुम्ही लवकरच बरे व्हाल असे सांगून आदरणीय भाऊ प्रत्येकाला आधार देत होते. इतकंच नव्हे तर वार्डातील स्वच्छता गृहाजवळ जाऊन त्यांनी तिथल्या परिस्थितीची पाहणी केली होती.

याप्रसंगी केवळ चार वर्षांची बालिका उपचारासाठी बालिकेचे माता कोरोना वार्डात असल्याचे आदरणीय भाऊंना समजलं व हे फक्त आईचं करू शकते असे गौरवोद्गार काढून रुग्णांच्या तब्बेतिची आस्तेवाईक पण विचारपूस करून त्यांना आपुलकी सल्ला व धीर देणारे आपले भाऊंच होते. यावेळी रुग्णही सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्याला भेटायला प्रत्यक्षात आपले आमदार आलेत म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर देखील थोडं का होईना स्मित हास्य दिसून येत होते. पण जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या माणसाचा निर्धार कुणीच रोखू शकत नाही असं म्हणतात या ठिकाणी प्रत्यक्ष भाऊ जेव्हा कोविड वार्डात पोहचले तेव्हा ते बघायला मिळाले..

सेनापतीच रणांगणात आल्यावर आम्ही सैन्य कसे मागे राहणार विशेष म्हणजे या वेळी आदरणीय भाऊंच्या कार्याने प्रभावित होऊन आम्हाला देखील लढ्याचं बळ।मिळालं आमचे देखील मनोबल वाढलं. मुक्ताईनगरात संघर्षाचा वारसा म्हणजे आदरणीय भाऊ आमदार झाल्यापासून संकटकाळी धाऊन येणारा देव माणूस म्हणजे आदरणीय भाऊंकडे जनता व जनतेला या भयानक परिस्थितीत प्रत्यक्ष या संकटाचा सामना करतांना फक्त भाऊंच दिसत होते. मग ते सरकारी अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात स्पॉट वरती नेऊन तिथंच येणारी समस्या व उद्भवणारी परिस्थिती आदरणीय भाऊ जागेवर सोडवताना दिसत होते. व त्या प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील करत आहेत.

आदरणीय चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या सारखे कार्यसम्राट दमदार आमदार या मतदारसंघात आभले आहेत या गोष्टींचा नक्कीच आनंद व अभिमान वाटतो. आदरणीय भाऊ आपण कोरोना रुग्णाचा वाँर्ड मध्ये रूग्ण चौकशी करायला गेलात हे फक्त मतदारसंघाचे आमदार म्हणून जीवाची पर्वा न करता आपणच करू शकता आदरणीय भाऊ तुमच्या सारखे आमदार पहिल्यांदाच प्रत्यक्षात जीव धोक्यात घालून काम करतांना बघितले आहेत.

ते म्हणतात ना….🔥
संघर्ष जितना कठीण होगा..💯
जित उतनीही शानदार होगी…..👑

म्हणून जेवढा संघर्षरूपी कठीण वाटेने चालत प्रवास केलेला आहे त्या संघर्षाच्या वाटेचा विजय देखील तेवढाच मोठा मिळाला आहे. आणि या संघर्षाच्या अग्नीत चालायचा निश्चय करणारा दिवस म्हणजे 14 सप्टेंबर.

आम्ही सांगितले होते..
आम्ही नक्की येणार..म्हणून आलोय…!!

इथल्या मायबाप जनतेच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी…
जनता जनार्दनाने जो आशीर्वाद दिलाय त्यांची सेवा करण्यासाठी…
इथल्या युवकांच्या प्रगतीसाठी…
इथल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी…
इथल्या शेतकरी राज्याच्या हितासाठी…
इथल्या प्रत्येक घटकाला न्याय देऊन त्यांची अडचण सोडवण्यासाठी..

आंदोलनपुरुष काय असतो हे या #मुक्ताईनगर च्या जनतेने स्वतः बघितले आहे. आदरणीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी शिवसेनेच्या रूपाने समाजकारण 80% व राजकारण 20% करत असतांना त्यांनी कधीच आपल्या जीवाची पर्वा केली नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून प्रसंगी जिवाचीही पर्वा न करता छाती – छाती भर नदीच्या पाण्यात उतरून केलेलं आंदोलन असो व अन्य कुठलंही. म्हणून हे आज आमदार रुपी यश बघायला मिळत आहे. अशी माणसं क्वचित मिळत असतात ज्यांनी आपल्या जनतेसाठी, जनसेवेसाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन आपला पुढील प्रवास करत असतात. आलो तर तुमचा नाहीतर शिवसेनेचा. “एकच ध्यास फक्त विकास” हेच ध्येय मनात बाळगून आदरणीय भाऊंचा हा प्रवास सुरू आहे.

आदरणीय भाऊंना या मतदारसंघातील अनेक मायबाप जनतेचे आशीर्वाद लाभले आहेत याची आठवण करून द्यायची म्हटल्यास निवडणूक लागायच्या आधी आदरणीय भाऊंचा तो झालेला अपघात आणि त्या चक्काचूर झालेल्या गाडीतून आपले भाऊ अगदी सुखरूप बाहेर निघणं म्हणजे हे केवळ आणि केवळ या मायबाप जनतेला तुम्हाला विधानसभेच्या तख्तावर बसलेलं बघायचं होत आणि त्यांची तुम्ही आज पर्यंत जी सेवा करत आलेला आहेत तीच पुण्याई आपल्याला त्या झालेल्या अपघातातुन वाचवू शकले.

आदरणीय भाऊ आपल्या पाठीशी असेच अनेक मायबाप, शेतकरी, जनता जनार्दनाचे आशीर्वाद आहेत , तुम्ही अशीच त्यांची सेवा करत राहो व या मायबाप जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत. आदरणीय भाऊंवर बोलायला गेलं तर खूप आहे ते वेळोवेळी आपण बोलत असतोच परंतु आज आदरणीय आपल्या लाडक्या भाऊंचा म्हणजे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी एक संघर्षयोद्धा विद्यार्थिसेना तालुकाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख ते आमदार चंद्रकांतभाऊ पाटील या माणसाबरोबर काम करत आहे.

आमदार कसे असावे तर…
भाऊराज म्हणजे आया बहिणींच्या रक्षणासाठी,
भाऊराज म्हणजे गरीब जनतेच्या हक्कासाठी,
भाऊराज म्हणजे मुक्ताईनगरच्या विकासासाठी,
भाऊराज म्हणजे युवकांच्या रोजगारांसाठी,
भाऊराज म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी..

न भूतो न भविष्यती असा मुक्ताईनगर मतदारसंघात जो विकासाचा बॅकलॉग भरायचा राहून गेला आहे तो बॅकलोक भाग्यविधाते आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांना जेव्हा पासून जनता जनार्दनाने आशीर्वाद देऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याची जी संधी दिलीय त्या संधीच सोन आदरणीय भाऊ करतांना वेळोवेळी दिसत आहेत.

जे 30 वर्षात होऊ शकलं नाहीय ते आदरणीय भाऊंनी आमदार होता बरोबर काही महिन्यांतच मतदारसंघाचे रूप पालटण्यास सुरुवात झाली आहे त्याचाच एक भाग म्हणजे मुक्ताईनगर येथील असलेलं उपजिल्हा रुग्णालय हे एका 5Star हॉटेल सारख असलेलं आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे आरोग्य मंदिरच आहे.

लेखाच्या शेवटी एक आठवण सांगतो आणि थांबतो. प्रसंग होता मुंबई मंत्रालय येथील. मी पहिल्यांदा ज्यावेळी आदरणीय भाऊ आमदार नव्हते त्यावेळी विधानभवनात जायचे असल्याने तिथल्या सुरक्षा रक्षकांनी माघारी पाठवले होते. परंतु त्याच ठिकाणी मनात निश्चय केला आणि मनातल्या मनात म्हटले होते, याठिकाणी आता येतील तर आपल्या हक्काच्या माणसाला आमदार रुपी सोबत घेऊनचं.. आणि तो दिवस उजाडला. त्यावेळी आदरणीय भाऊंसोबत मग मंत्रालय असो वा विधानभवना मतदारसंघातील सामान्य माणसासाठी लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता, कामाची पद्धत मुंबईत भाऊंसोबत प्रत्यक्षात पहिल्यांदा अनुभवायला मिळाली. घंटो का काम मिनटो मैं.. करणारे, त्वरित मिळणारा न्याय, त्वरित होणारे काम यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळतो तो फक्त इथेच.

ना मंजिल है ना ठिकाना,
कर हौसले बुलंद बस चलते ही जाना !

आंदोलन पुरुष शेतकरी, शेतमजूर, शोषित,मजूर, कामगार, दिनदूबळे, उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र संघर्ष करणारा लढवय्या झुंझार नेतृत्व अन्यायी प्रशासनाला वठणीवर आणुन सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे सर्वांचे लाडके लोकनेते भाऊराज म्हणजेच ज्यांनी समाजकार्यतून राजकारण करणे शिकवले व कमी वयातच आम्हास नाव लौकिकास आणले असे माझे राजकीय गुरू आदरणीय आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील.

सामाजिक व राजकिय जीवनात काम करत असताना कधी काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणींवर मात कशी करायची याचे मार्गदर्शन माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला भाऊ आवर्जून करत असतात. असेच तुमचे आशीर्वाद, प्रेम, मार्गदर्शन, साथ आमच्या पाठीशी कायमस्वरूपी असू द्या एवढंच सांगतो. “साथीला तुम्ही रहा उभे मी वाट चालतो”. आणि थांबतो.

आदरणीय भाऊ आपण येणाऱ्या काळात पावलोपावली यशस्वी व्हावं , आपला विकासाचा आलेख असाच नेहमी उंचावत राहावं व आपण यशाचं सर्वोच्च शिखर गाठावे. आदरणीय भाऊ, आपणास मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी.. या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी.. उदंड आयुष्य, बलदंड शक्ती मिळो अशी आई भवानी चरणी प्रार्थना.

खरंच आदरणीय भाऊ तुमचे एकच मन कितीवेळा जिंकावे तुमच्या सारखा लोकप्रतिनिधी कोणी होणे शक्य नाही. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. खरच आदरणीय भाऊ तुमच्या कार्यला सलाम. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना लवकर यश येवो, आणि येणाऱ्या 2024 पासून तुमचा रथ मंत्रिपदाच्या रूपाने अखंड महाराष्ट्रात घुमो, हीच आई मुक्ताई चरणी तसेच आई भवानी चरणी प्रार्थना करतो.

तूर्तास धन्यवाद.. आदरणीय भाऊ आपणांस एवढंच सांगेल, मतदारसंघाची काळजी घेत असताना स्वतःची देखील काळजी घ्या. तुम्ही आमच्यासाठी लाख मोलाचा एकचं हिरा आहात.

तुषार प्रकाश कचरे – संस्थापक अध्यक्ष
तुमचा तुषार युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. 9657416879

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.