DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी केली दुचाकी चोरीच्या संशयितांची ओळख परेड

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून त्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे असलेल्या ४४ संशयितांची सुमारे दोन तास ओळख परेड घेतली.

एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जळगाव उपविभागातील मोटर सायकल चोरीचे गुन्हे करणारे आरोपींची ओळख परेड आज ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व विभागातील एकूण 44 आरोपींची ओळख परेड घेण्यात आली . उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संदीप गावित यांच्या उपस्थित घेण्यात आली त्यावेळी जळगाव विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान या ओळख परेडमध्ये आरोपींचे इंट्रोमेशन फॉर्म भरण्यात त्यांच्याकडून मोबाईल क्रमांक घेण्यात आले.या सर्व संशयितांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.