तरसोद येथे माजी सैनिकाच्या हस्ते शिलाफलक अनावरण
जळगाव;- तालुक्यातील तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्र शिलाफलक उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिक शामराव रामराव पाटील यांच्या हस्ते शिलाफलकावर पुष्पहार अर्पण करून अनावरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना पंच प्रण प्रतिज्ञा देण्यात आली. माजी सैनिक शामराव पाटील यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांनी केला. त्याचप्रमाणे ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, मुख्याध्यापक मिलींद कोल्हे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी सत्कार केला.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग –
या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनिस, आरोग्य सेविका, आशा वर्कर तसेच बचतगटाच्या सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याच कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सेल्फी पॉईंटचे आकर्षण-
याठिकाणी मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत एक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. यात आलेल्या प्रत्येकाने आपापला सेल्फी काढून घेतला. यात जिल्हाधिकारी सुध्दा मागे राहीले नाहीत. एव्हढेच नाही तर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांसमवेत गप्पा गोष्टी करत सेल्फी काढला.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी भरत कोसोदे, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी आर.एम.सपकाळे, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी पद्माकर अहिरे, श्री.पठाण, केंद्रप्रमुख अजय शिरसाट, सरपंच संतोष सावकारे, ग्राम पंचायत सदस्य पंकज पाटील, ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, डॉ.जोशी, जि.प.शाळा तरसोदचे मुख्याध्यापक मिलींद कोल्हे, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.