अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले
गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळू वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टरवर कारवाई
जळगाव : प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त केले असून चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा नदीपात्रातून विना परावना अवैधरित्या वाळूचा उपसा करुन ते ट्रॅक्टरमधून वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर मोहाडी ते धानोरा रोडवरील नागझिरी फाट्याजवळ तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडे वाळूवाहतुकीचा परवाना असल्याबाबतची विचारणा करण्यात आली. परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने पोलिसांनी ते दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जप्त केले. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही ट्रॅक्टररील चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना प्रकाश चिंचोरे व पोना अनिल फेगडे हे करीत आहे.