जळगावमधून दुचाकी लांबविली
जळगाव;- शहरातील दीक्षित वाडी येथील मकरा अपार्टमेंट येथून 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अभिषेक अशोक तिवारी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून ते मकरा अपार्टमेंट दीक्षित वाडी येथे राहतात. त्यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच एकोणावीस ए आर 45 72 ही 30 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास लावली होती मात्र सकाळी एक ऑक्टोबर रोजी मोटरसायकल जागेवर दिसून आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आल्याने त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर सात रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महिला हेड कॉन्स्टेबल पल्लवी मोरे करीत आहे.
