DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव शहरात युवकाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव (प्रतिनिधी) :- अविवाहित एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शहरातील खोटे नगर परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मयत युवकाच्या आई वडिलांचे चार पाच वर्षांपूर्वी निधन झाले असून त्याला तीन बहिणी आहेत . याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाळासाहेब लोटन पवार (३५, रा. खोटेनगर) असे या युवकाचे नाव आहे. एमआयडीसी परिसरात तो एका कंपनीत  कामाला होता. बाळासाहेब पवार याच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा युवक जळगावातील खोटेनगरात भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर दिसून न आल्याने घरमालक यांना संशय आल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता बाळासाहेब हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्या वेळी त्यांनी तालुका पोलिस स्टेशनला माहिती दिल्यावरून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.

या युवकाने शनिवारी रात्रीच गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविला जात असून बाळासाहेब पवार याला तीन बहिणी आहेत . त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यातील नंदाडे येथे राहतात. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.