DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मनपा आयुक्तांचे जळगावातील रस्ते तातडीने करण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र

जळगाव ;- शहरातील तीन मुख्य रस्त्यांसह ४९ रस्त्याची कामे आपल्या विभागामार्फत करण्यात येत आहेत. मात्र, आजपर्यंत कामाची प्रगती पाहता ते संथगतीने सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जनतेची कामे तातडीने करावी, असे पत्र महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. पत्रात म्हटले आहे, की आपल्यामार्फत करण्यात आलेल्या ४९ रस्त्यांच्या कामाची स्थिती अशी दिसून आली आहे.

डब्लूबीएम लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- ०४, एमपीएम लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- ०९, बीएम लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- २७, कारपेट लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- ०४, अद्यापपर्यंत सुरू न झालेली कामे- ०१. तसेच, सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस संपलेले असल्याने कामे करण्यातबाबत मक्तेदारास आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत.

याबाबत आपणास वेळोवेळी पत्र देवून सूचित करण्यात आले असल्याचेही पत्रात म्हटले आहे.शहरातील जिल्हा परिषद चौक ते स्मशानमूमी चौकापर्यंतचा रस्ता, भोईटे रेल्वे गेट ते महेश प्रगती हॉलपर्यंतचा रस्ता व महेश प्रगती हॉल ते सेवामंडळ रस्ता हे शहरातील प्रमुख तीन रस्ते आहेत. ते डांबरीकरणाचे कामही आपल्याकडे आहे.

हे तीनही वर्दळीचे रस्ते असल्याने या रस्त्याची कामे तातडीने हाती घेवून ती पूर्ण करण्यात यावीत. जेणेकरून नागरिकांना वाहतूकीची सुविधा उपलब्ध होईल. दरम्यान, आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या या पत्राची प्रत पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही पाठविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.