बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना अटक
जळगाव- – पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना रामानंद नांगर पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा येथील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये प्रशांत गणेश माहोरे राहत असून दि. ३ ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला येथे गेले असल्याने त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरू नेल्याचा प्रकार उघडकीस आला अहोता.
दि. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना लहान भावाने फोन करुन घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे गणेश माहोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्यावरून मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून संशयित सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा हुडको), अब्रार अमित खाटीक (वय १८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय २२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (वय २५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुशिल चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने केली.