DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव शहराध्यक्षपदी सुशील कुमार शिंदे

तर साहिल मुशीर पटेल यांची जळगाव शहर कार्याध्यक्षपदी निवड

जळगाव ;- येथील राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाचे सुशील कुमार शिंदे यांची जळगाव शहराध्यक्षपदी तर साहिल मुशीर पटेल यांची जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी देण्यात आले.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे यांची जळगाव शहराध्यक्षपदी तर जळगाव शहर कार्याध्यक्षपदी साहिल मुशीर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा.असून निवडीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

दरम्यान अमर पाटील – प्रदेश सरचिटणीस (कार्यालयीन ) , सनी देवकते प्रदेश सचिव ,अभिषेक आव्हाड – जिल्हाध्यक्ष सोलापूर (ग्रामीण) ४) सुहास कदम – शहराध्यक्ष सोलापूर , अक्षय भांड – कार्याध्यक्ष सोलापूर (ग्रामीण) , सुशील कुमार शिंदे – शहराध्यक्ष जळगाव , साहिल पटेल – शहर कार्याध्यक्ष जळगाव , आदींच्या या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. .

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.