DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विद्यार्थी, पालक व शिक्षक या तिघांच्या समन्वयातूनच शैक्षणिक विकास शक्य : प्रा. सोनल तिवारी

जळगाव,;- येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी,बारावी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापकवृंद तसेच अकरावी,बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात शिक्षक प्रियांका मल व संदीप पाटील यांच्या प्रेझेन्टेशनने झाली.

 

त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. यानंतर प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी अकरावी,बारावी वर्गातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सायन्स व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच शिक्षकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश तसेच विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावेळी आयोजित चर्चासत्रात सर्व पालकांनी उत्स्फुर्त संवाद साधला.

 

पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. पालकांनी विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले. निकिता वालेचा यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप पाटील, शीतल किनगे, प्रियंका मल, राहुल यादव, मीनाक्षी पाटील, नयना चौधरी, शिवानी देशमुख, निकिता कौरांनी, नेहा लुनिया व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनिल सोनार व संतोष मिसाळ यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.