DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; युवक जागीच ठार

पाचोरा ;जळगाव – पाचोरा महामार्गावर तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जयमल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने – १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी असलेले दुचाकी स्वारांना धडक दिली असता यामध्ये एक इसम जागीच ठार झाला असून दुसऱ्या गंभीर जखमी झाल्याने त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी नितीन नामदेव भोई (वय – ३०) व एकनाथ कोळी (वय – ३२) हे मोटरसायकलने पाचोऱ्याकडुन नांद्र्याच्या दिशेने जात असतांना त्यांच्या दुचाकीस अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यातील नितीन भोई यांचा मृत्यू झाला असून एकनाथ कोळी हे गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी घटना घडताच तालुक्यातील पहाण येथील शेतकरी स्वप्निल महाजन हे प्रवास करीत असतांना त्यांना अपघात झाल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी तात्काळ हायवे मृत्युंजय दूत राहुल महाजन यांना घटनास्थळी बोलून घटनेची माहिती मिळताच हायवे मृत्युंजय पथकाचे राहुल महाजन हे घटनास्थळी दाखल होवुन त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका चालकास पाचारण केले. दरम्यान नितीन भोई व एकनाथ कोळी यांना रुग्णवाहिका चालक गोलु शिंदे यांच्या मदतीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी नितीन भोई यांना मृत घोषित केले. तर एकनाथ कोळी यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.