DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ट्रॅक्टरच्या धडकेत कठोरा येथे एक जण ठार

वरणगांव ;- भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकळाच्या सुमारास घडली

याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कठोरा येथील गंगाराम भास्कर पाटील ( ५८ ) हे शेतात जात असताना प्रल्हाद सिताराम पाटील यांच्या घरा समोर पाठीमागुन येणाऱ्या एम एच १९ ई ए ४०३० या ट्रॅक्टर ने पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मृत घोषीत केले

या बाबत वरणगाव वरणगाव पोलीस स्टेशनला संजय भास्कर पाटील यांच्या खबरी वरून
ट्रॅक्टर ड्रॉयव्हर संकेत अनिल पाटील त्याच्या विरोधात भादवी कलम ३०४ अ , २७९, ३३७ , ३३८ , १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास पोहेकॉ मनोहर पाटील हे करीत आहे

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.