DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गिरणा नदीत बैलगाडी उलटली; कष्टकरी शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू

जळगाव - तालुक्यातील गिरणा नदी पात्रात बैलगाडी उलटून एका शेतमजुराचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५, रा. वडनगरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ…

जळगावसह उत्तर महाराष्ट्र उष्णतेने होरपळला; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

जळगाव - राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढत असलेली उष्णतेची तीव्रता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उत्तर…

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया..

जळगाव  :  श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ, जळगाव यांच्या वार्षिक सभेचे आयोजन दि. १० मे २०२६ रोजी जैन हिल्स येथे करण्यात आले होते. सभेची सुरुवात शासनपती भगवान महावीर स्वामीजी, प. पू. आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा., वर्तमान आचार्य…

वीज खांबावर काम करताना तरुणाचा मृत्यू; जामनेरमध्ये दुर्दैवी घटना

जामनेर : शहरातील महावितरण कार्यालयासमोर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून एका २० वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला. सागर इंगळे असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या…

सोने-चांदी दरात घसरण; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची बाजारात चर्चा

जळगाव : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढली असून त्याचा परिणाम भारतीय सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान…

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

जळगाव : येथील आदित्य अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी परीक्षेत ९०% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तो सेंट टेरेसा स्कूलचा विद्यार्थी असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.…

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जळगाव : जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील आठ व ७ वर्ष वयोगटातील दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षाखालील…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

जळगाव  - तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाच दिवसीय निवासी बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई,…

राज्यात हवामानाचा मोठा बदल; काही भागात पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेचा कहर

मुंबई – राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून एका बाजूला तीव्र उष्णतेचा तडाखा बसत असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस…

भुसावळ नगराध्यक्ष पदावर संकट गडद; न्यायालयाकडून स्थगिती नाकारली

जळगाव – भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राला अवैध ठरविण्यात आल्यानंतर…